
संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंची भेट
संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंची भेट कशी झाली?
राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे नॉट रीचेबल होते. संजय राऊत यांनी रविवारी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. पण यावेळीही संभाजीराजेंचा संपर्क होत नव्हता. परंतु आता सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो साताऱ्याचे भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंसोबतचे आहेत. यामुळे हे फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंच्या भेटीचे फोटो
कोणाच्याही संपर्कात नसणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार शिवेंद्रराजेंची भेट घेऊन काय चर्चा केली असेल? या बद्दल आता तर्क वितर्क मांडले जात आहेत. दोन्ही राज घराण्यांची झालेली भेट ही नवीन राजकारणाची नांदी तर नसावीना? असा प्रश्न सातारकर उपस्थित करू लागले आहेत.
संभाजीराजे यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट केली होती. ‘आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांची अचानक भेट झाली. महामार्गावर असूनही सुद्धा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच वृद्धींगत राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना!’, असं फेसबुक पोस्टमध्ये संभाजीराजेंनी लिहिलं.

संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंच्या भेटीचे फोटो
संभाजीराजेंच्या पक्षात जाणार का? शिवेंद्रराजेंचं नेमकं आणि थेट उत्तर
खासदार उदयनराजे भोसलेही चर्चेत
खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्ठींमुळे चर्चेत असतात. उदयनराजे भोसले हे रस्त्यावरील भिक मागणाऱ्या लहान मुलांकडे पाहून बऱ्याच वेळेला भावुक झाल्याचं सुद्धा पहायला मिळालं. असाच एक प्रकार आज साताऱ्यात घडला. रस्त्यावर पुस्तकं विकणाऱ्या मुलीच्या समोर ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगून त्या मुलीकडची सगळी पुस्तकं राजेंनी पैसे देवून विकत घेतली. विकत घेतलेली पुस्तकं अनाथालयातल्या मुलांना द्यायलाही सांगितली. राजेंच्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. त्यांच्या या दिलेरीची चर्चा सुद्धा साताऱ्यात जोरदार चर्चा आहे.

रस्त्यावर पुस्तकं विकणाऱ्या मुलीकडून विकत घेतली सर्व पुस्तकं
‘आगीत तेल ओतण्याचं काम शिवेंद्रराजेंनी करु नये’, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा टोला