मुंबई: ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री जुही चावला आता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. जुहीने तिच्या सौंदर्याच्या आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. जुही सध्या चर्चेत आली आहे, कारण ठरलंय करण जोहरची बर्थडे पार्टी. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनं नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्तानं एका जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
ऋषी कपूर यांच्या गाण्यावर थिरकल्या नितू कपूर, हा Video पाहाच!
जुही देखील तिचे पती जय मेहता यांच्या सोबत पार्टीला आली होती. तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. फोटोसाठी पोज देत असताना जुही पतीसोबत उभी होती. परंतु तिचं वागणं पाहून नेटकऱ्यांनी जुहीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पती जय मेहता बाजूला उभे असताना ती त्यांच्याकडं दुर्लक्ष म्हणजेच त्यांना इग्नोर करताना दिसली. त्यानंतर तिचे पती स्वत: बाजूला निघून गेले.

जुहीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका युझरनं लिहिलं, हा तिचा नवरा आहे का? तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं की, ती नवऱ्याला अतिशय वाईट वागणूक देतेय. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लिहिल्या आहेत. इतकं अवघडल्यासारखं वाटत असेल कर कशाला लग्न केलंस? असा प्रश्नही एकानं विचारला आहे.

जुही आणि तिचे पती जय यांच्या वयात सात ते आठ वर्षांचा फरक आहे. पण जय याचं वय बरंच जास्त असल्याचं वाटतं. त्यामुळं जुहीला आजही ट्रोल करण्यात येतं. वडिलांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीशी लग्न का केलं, फक्त पैशांसाठी केलंय का? अशा टीका तिच्यावर यापूर्वीही करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here