मुंबई: मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव अजूनही नियंत्रणात आलेला नसून आज करोनाचे १८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरनाबाधीत रुग्णांची संख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

मुंबईत आज करोनाचे १८३ नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १९३६ इतकी झाली आहे. (११३ मृत्यू धरून). मुंबईतील मृतांचे प्रमाण आज कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने २ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून त्याचाच हा परिणाम असल्याचे दिसत आहे. या दोन मृतांपैकी एका रुग्णाला दीर्घकालीन आजार होते तर दुसरी व्यक्ती वयोवृद्ध होती. आतापर्यंत मुंबईत करोनामुळे ११३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज १७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १८१ इतकी झाली आहे. अन्य आकडेवारी पाहिल्यास करोना सदृष्य लक्षणे असलेले एकूण २६१ नवीन रुग्ण आज विविध रुग्णालयांत दाखल झाले असून अशा रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ३७९ इतकी झाली आहे.

करोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात असून आतापर्यंत अशा ८५७ जणांचा शोध घेण्यात यश आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here