Dhananjay Munde | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अखेर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागेल, असे बोलले जात होते. मात्र, शेवटच्या क्षणी सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर झाल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. आता विधानपरिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार का, हे पाहावे लागेल.

 

Pankaja Munde Dhananjay Munde
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे

हायलाइट्स:

  • पंकजा मुंडे या सर्वच पदांसाठी पात्र आहेत
  • हाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना डिवचले
  • पात्र असणं आणि त्यांच्यावर जबाबदारी देणं यात अंतर आहे
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गोटात पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार, अशी चर्चा आहे. राज्यसभा किंवा विधानपरिषदेत त्यांना संधी मिळेल, असे बोलले जात होते. मात्र, भाजपने राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर धनंजय महाडिक यांना संधी दिल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा यांना खोचक टोला लगावला आहे.

पंकजा मुंडे यांच्या राज्यसभा आणि विधानपरिषदेतील उमेदवारीविषयी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही विचारणा करण्यात आली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी,’पंकजा मुंडे या सर्वच पदांसाठी पात्र आहेत’, असे वक्तव्य केले होते. हाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना डिवचले. देवेंद्र फडणवीस यांनी एखादी व्यक्ती पात्र आहे असं म्हटल्यावर इतर कोणीही त्यासाठी पात्र नाही, असं म्हणण्याचं काही कारण नाही. पात्र असणं आणि त्यांच्यावर जबाबदारी देणं यात अंतर आहे. हे अंतर फक्त कोठे अडचणीचं ठरू नये एवढंच, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. आता यावर पंकजा मुंडे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Devendra Fadnavis: धनंजय महाडिकांना कसं निवडून आणणार, भाजपच्या स्ट्रॅटेजीवर फडणवीसांचं सूचक भाष्य
पंकजा मुंडेंची आणखी एक संधी हुकली

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अखेर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागेल, असे बोलले जात होते. मात्र, शेवटच्या क्षणी सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर झाल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्यसभेसाठी माझं नाव चर्चेत नव्हते. पण ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, त्यांच्याविषयी मला आनंद आहे. पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळणे अपेक्षितच होते. अनिल बोंडे यांच्या रुपाने विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या नेत्याला संधी मिळाली, याचा आनंद असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp leader dhananjay munde taunt bjp pankaja munde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here