काय आहे व्हिडिओ:
शेअर केलेल्या या व्हिडिओत गौतमी सुरुवातीला म्हणते की, हॅप्पी बर्थडे ताई. अशी ताई जगात सगळ्यांना मिळो. तुम्हाला इतकं छान जपतेस,फुलासारखं जपतेस, कधी काही काम सांगत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी. त्यानंतर ती मृण्मयीचे पाय चेपताना दिसत आहे. फक्त व्हिडिओसाठी पाय चेपायची अॅक्टिंग करू नकोस, असं मृण्मयी म्हणताना दिसतेय.
यापूर्वीही बहिणींच्या या आंबट गोड नात्याचे काही धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘आम्ही व्हिडीओमध्ये दाखवत असलेल्या गोष्टी प्रत्येक घराघरात घडणाऱ्या आहेत आणि त्याला कोणी अपवाद नाही त्यामुळे हे सगळे व्हिडीओ लोकांना आवडतात’, असं मृण्मयी म्हणते.
गमतीशीर व्हिडीओज टाकायचे ही कल्पना त्यांच्या दोघींच्या डोक्यात खूप आधीपासून होती आणि पहिला व्हिडीओ पोस्ट केल्यानंतरच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. अनेकांना हे व्हिडीओ नव्यानं बनवले आहेत किंवा त्यांनी अभिनय केला आहे असंही वाटलं. पण ते त्या-त्या क्षणी टिपलेले आहेत आणि त्यामुळे ते तितकेच खरेसुद्धा आहेत. मृण्मयी आणि गौतमीच्या फक्त चाहत्यांनाच नाही तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनादेखील ते व्हिडीओ भावले आहेत. त्यामुळे सगळेच त्यांच्या नवीन पोस्टची वाट पाहत असतात. अनेक जण सध्या ट्रोलिंगला सामोरं जातात; पण मृण्मयी-गौतमी यांच्या व्हिडीओबद्दल एकही आक्षेपार्ह प्रतिक्रिया केलेली नाही. या सगळ्या प्रक्रियेमधल्या खरेपणाला लोकांची पसंती मिळतेय. या दोघी बहिणी एकमेकींच्या सर्वात जवळच्या मैत्रिणी, एकमेकींचा हक्काचा आधार आणि एकमेकींचं विश्व आहेत असल्याचं मृण्मयीनं सांगितलं.