राज्यातील सध्याचे वातावरण पाहता महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज आहेत. हे नाराज आमदार भाजपला मतदार करतील. भाजपकडे सध्या स्वत:ची ३० ते ३२ मतं आहेत. १,२, ३ अशा पद्धतीने मतदान होणार आहे. अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजपचा हातखंडा आहे. तिसरी जागा ही भाजपचीच होती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अतिरिक्त १० मतांची बेगमी केली आहे, असे धनंजय महाडिक यांनी म्हटले.
धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी भाजपचा खास प्लॅन
भाजपने तिसऱ्या जागेसाठी रविवारी रात्री उशीरा धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर केले. मात्र, भाजपकडे फक्त २२ मतं आहेत. अपक्षांची मदत घेतली तरी भाजप फारतर ३२ जागांपर्यंत मजल मारू शकतो. त्यामुळे भाजप ही जागा कशी निवडून आणणार, याचा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक भाष्य केले आहे.आम्ही राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरवलाय, म्हणजे आम्ही काहीतरी विचार केला असेल. तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार, याबाबत आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पण त्याबद्दल मीडियात चर्चा करायची नसते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.