जुन्नर : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्याचे वास्तव्य वाढत आहे. विशेषत: उसाच्या पिकामध्ये बिबट्या आढळण्याचा घटना वारंवार घडत असतात. अशातच जुन्नर तालुक्यातील ओतूर गावाजवळ असणाऱ्या डुंबरवाडी शिवारामध्ये ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचा बछडा आढळून आला. या बछड्याचे आणि त्याचे आईचे मनोमिलन करण्यात वनविभागाला यश आलं आहे.

ओतूर वनविभागाने या बछड्याला रेस्क्यू करत त्याच्या आईच्या कुशीत सोडून दिले. या रेस्क्यूचा व्हिडिओ वनविभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis: धनंजय महाडिकांना कसं निवडून आणणार, भाजपच्या स्ट्रॅटेजीवर फडणवीसांचं सूचक भाष्य

ओतूर येथील शेतकरी बाळासाहेब विठ्ठल डंबरे यांच्या शेतात ऊस तोडणीच्या दरम्यान बिबट्याचा बछडा आढळला. मादी जातीचा अंदाजे २ महिने वयाचा हा बछडा होता. याबाबत ओतूर वनविभागाने सायंकाळी रेस्क्यू टीमच्या माध्यमातून कॅमेरा लावून बछडा मादीच्या भेटीसाठी ठेवला. मादी तेथे फिरून गेली, मात्र बछडा नेला नाही. त्यानंतर मादी बिबट्या पुन्हा आला आणि ३ ते ४ दिवसांनंतर बछड्याला आपल्यासोबत घेऊन गेला. बछडा आणि त्याच्या आईचे यशस्वीरित्या पुन्हा मिलन झाले.

दरम्यान, मागील २ महिन्यांमध्ये हे पाचवे यशस्वी ऑपरेशन असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे.

मुलाला घरी एकटं सोडून कसं जाणार? पेट नवाबला केदारनाथला घेऊन जाण्याच्या वादावर मालकाचं उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here