मुंबई: जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ची दर वर्षी चर्चा होते. तिथल्या रेड कार्पेटवर येणाऱ्या सेलिब्रेटी आणि त्यांच्या पेहरावाविषयीही बोललं जातं. या ग्लॅमरस मंचावर भारतीय कलाकारांची वर्णी नेहमी चर्चेचा विषय ठरते. या वर्षी सर्वात जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची. पहिल्या दिवसापासून दीपिकाचे लुक चर्चेत होते. दीपिकाच्या स्टायलिश लुकचं अनेकांनी कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं.
Cannes Video- हात हटवत राहिली दीपिका पादुकोण, तरीही सतत किस करत राहिला तो व्यक्ती
दीपिकानं पाश्चात्त्य स्टायलिंग आणि भारतीय रेट्रो स्टाइल यांचा उत्तम समन्वय साधला. पहिल्या दिवशी ग्रीन पँट आणि व्हाइट शर्ट, नंतर काळ्या आणि सोनेरी रंगाची साडी, त्यानंतर रेड गाउन असे दीपिकाचे पेहराव होते. कान्सच्या शेवटच्या दिवशीही दीपिकानं साडीला प्राधान्य दिलं. तिनं इंडो-वेस्टर्न साडी परिधान केली होती. तर मोत्यांचा नेकपीस गळ्यात घातला होता. तिचा हा लुकही प्रचंड चर्चेत आहे.

दीपिकानं शेवटच्या सत्रात घातलेल्या भरजरी पोशाखाची आणखी एका कारणासाठी चर्चा आहे. पांढऱ्या रंगाच्या फ्रिलच्या या साडीवर तिनं परिधान केलेली मोत्यांची जाळी पाहून नेटकऱ्यांना ऐश्वर्या रायच्या ‘जोधा-अकबर’ या चित्रपटाची आठवण झाली. अनेकांनी त्यावर ‘ही तर कॉपी’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


दीपिकाला नारंगी रंगाच्या गाऊनमधील लुकसाठीही ट्रोल करण्यात आलं होतं. या गाऊनमधील दीपिकाचा रेड कार्पेट लुक समोर आल्यानंतर तिचं झालं पण त्याबरोबर तिची झालेली दमछाक चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही आहे. दीपिकाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती हा गाऊन सांभाळताना दिसत आहे. दीपिका अक्षरश: दमली असल्याचं या व्हिडिओतून दिसते आहे. दरम्यान दीपिकाच्या चाहत्यांनी तिच्या या लुकवर काही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी ‘डिझायनरचा जॉब यानंतर जाणार’ अशी कमेंट केली आहे तर काहींनी ‘चला झाडू मारुन झाली’ अशीही कमेंट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here