बीड : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांमध्ये ८६ शेतकऱ्यांनी नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यातील ४८ शेतकरी हे पात्र आहेत. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने यावर वेळीच रोख लावणं गरजेचं आहे. आणि याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी गळफास आंदोलन करण्यात आले.

पात्र शेतकऱ्यांना अद्यापही शासकीय मदत वेळेवर मिळालेली नाही. शेतकरी नेमका कसा मेटाकुटीला आला. याकडेच लक्ष वेधण्यासाठी बांबूला दोरखंड बांधून प्रतीकात्मक स्वरूपात हे आंदोलन केलं गेलं. शेतकऱ्यांवर प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ येते आहे. आता किमान पात्र शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

मागील १५ दिवसांपूर्वीच गेवराईच्या हिंगणगाव इथल्या नामदेव जाधव या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. आजही या कुटुंबाला शासकीय मदत मिळालेले नाही अशी जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी आहेत ज्यांना शासकीय मदत मिळाली नाही. ही मदत कधी मिळणार या शेतकऱ्यांना आत्महत्या करूनही न्याय मिळत नसेल तर या शासनाचं करायचं काय? हा देखील मोठा प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळत आहे.

अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला घेरण्याचा चीनचा डाव फसला, पॅसिफिक देशांचा ड्रॅगनला धक्का
मात्र, जिल्ह्यातील अनेक शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहेत आणि यांची झुंज जिवंतपणी देखील आणि मेल्यावर देखील ही झुंज जर खेळायची असेल तर शेतकरी म्हणून जन्माला येणे पाप आहे की काय?, असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनाला भेडसावत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्यांचं लक्ष वेधण्याचे काम जरी होत असेल तरी या शेतकऱ्यांना मदत मिळेल का या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हेच आता पाहणं गरजेचे ठरणार आहे.

फोन वारंवार चार्ज करण्याची नाही गरज, खरेदी करा 7000 mAh Battery चे ‘हे’ पॉवरफुल स्मार्टफोन्स, सुरुवातीची किंमत ११,९९९ रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here