मुंबई : ‘आयपीओ’मध्ये नुकसान सोसावं लागलेल्या ”च्या गुंतवणूकदारांना आज महामंडळाने किंचित दिलासा दिला. चौथ्या तिमाहीत नफ्यात १७ टक्के घसरण झाली. नफा कमी झाला असला तरी ‘एलआयसी’ने १.५० रुपया प्रती शेअर लाभांशची घोषणा केली.

आयुर्विमा महामंडळाने आज सोमवारी ३० मे २०२२ रोजी चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत महामंडळाला २,४०९.३९ कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात १७.४१ टक्के घसरण झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत एलआयसीला २,९१७.३३ कोटींचा नफा झाला होता.

या तिमाहीत ‘एलआयसी’चे निव्वळ उत्पन्न १,४४,१५८.८४ कोटी इतके राहिले. त्यात १७.८८ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत एलआयसीला १,२२,२९०.६४ कोटींचा महसूल मिळाला होता. एलआयसीला गुंतवणुकीतून चौथ्या तिमाहीत ६७,८५५.५९ कोटींचे उत्पन्न मिळाले. त्यात गत वर्षाच्या तुलनेत किंचित वाढ झाली.

आज ‘एलआयसी’च्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यात मार्चच्या तिमाहीतील ताळेबंदाला मान्यता देण्यात आली. एलआयसीने शेअर बाजाराला निकाल सादर केला आहे. समभागधारकांना प्रती शेअर १.५० रुपया लाभांश देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

निकालापूर्वी शेअर होता तेजीतदरम्यान, तिमाही निकाल आणि लाभांश घोषणेपूर्वी एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. आज सोमवारी मुंबई शेअर बाजारात एलआयसीचा शेअर ८३७.०५ रुपयांवर बंद झाला. त्यात १.८९ टक्के वाढ झाली. आज एलआयसीचे बाजार भांडवल ५,२९,४३४ कोटी इतके वाढले.

आयपीओनंतर शेअरमध्ये १३ टक्के घसरण
‘एलआयसी’ने १७ मे २०२२ आठवड्यात शेअर बाजारात प्रवेश केला होता. एलआयसीने २१ हजार कोटींचे भांडवल उभारले होते. केंद्र सरकारची १०० टक्के मालकी असलेल्या एलआयसीमधील ३.५ टक्के हिश्श्याची विक्री केली होती. भारतीय भांडवली बाजारातील आजवरचा हा सर्वात मोठा आयपीओ ठरला. मात्र एलआयसीची नोंदणी नकारात्मक झाली. तो आयपीओ प्राईसच्या तुलनेत ८ टक्के सवलतीच्या दरात सूचीबद्ध झाला होता. आयपीओसाठी एलआयसीने प्रती शेअर ९०२ ते ९४९ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. या किंमतीच्या तुलनेत सध्याचा शेअरचा भाव १३ टक्क्यांनी कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here