शहरातील मेहरूण परिसरातील रहिवासी असलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. करोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने, त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील करोना संसर्ग विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते. २८ मार्च रोजी रात्री त्याच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या रुग्णावर करोना संसर्ग कक्षात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १४ दिवसांनंतर त्याची पुन्हा पहिली वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाची दुसरी वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तिचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. तो निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. रुग्णाने करोनावर यशस्वी मात केल्यानंतर बुधवारी दुपारच्या सुमारास त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times