नांदेड : राज्याचे माजी मंत्री डी पी सावंत यांच्या घरात शिरत एका बंदुकधारी युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखली तर कर्मचाऱ्याला मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डी पी सावंत यांच्या नांदेडमधील निवासस्थानी ही घटना घडली. विशेष म्हणजे डी पी सावंत यांचे निवासस्थान हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अगदी समोरच्या बाजूस आहे. साहिल माने नावाचा हा युवक असून तो आज सकाळी ९ च्या सुमारास सावंत यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी आला होता. त्याने सावंत यांची भेट घेतली. काही कामानिमित्त तो सावंत यांना भेटला होता. पुन्हा दुपारी तो युवक परत सावंत यांच्या निवासस्थानी आला. काही कामासाठी त्याने सावंत यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सावंत यांनी सांगितले.

घरातील कर्मचारी सुभाष सावंत याने त्याला घराबाहेर काढले. तासभर घराबाहेरील बाकावर तो युवक बसला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी साहिल माने पुन्हा घरात शिरला. डी पी सावंत यांच्याकडे त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. त्यावेळी सावंत यांनी आपल्या कर्मचाऱ्याला बोलावून त्याला बाहेर काढण्यास सांगितले. कर्मचारी सुभाष सावंत आरोपी युवक साहिल माने याला पकडून बाहेर नेत असताना अचानक त्याने बंदूक काढली. बंदुकीने पवार यांच्या डोक्यात ४ ते ५ वेळा मारहाण केली. त्यानंतर डी पी सावंत यांच्यावर त्याने बंदूक रोखली. तात्काळ पैसे द्या नाही तर गोळी झाडण्याची त्याने धमकी दिली.

नारायण राणेंच्या अडचणी वाढणार? अधिश बंगल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाची नोटीस
कर्मचाऱ्याने पुन्हा झटापट केल्यावर आरोपी साहिल माने पळून जात होता. मात्र, त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या सुरेश सावंत यांना डी पी सावंत यांनी त्या आरोपीस पकडण्यास सांगितले. दुचाकीवर पाठलाग करत मोठ्या हिमतीने सुरेश सावंत यांनी आणि काही नागरिकांनी आरोपी साहिल माने याला पकडले.

UPSC निकाल : वडिलांचं अधुरं स्वप्न लेकीकडून पूर्ण, मराठवाड्यातील मानसीचा देशात डंका
आरोपीला पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी साहिल माने याच्याकडे असलेली बंदूक बनावट असल्याचे पोलीसांनी सांगितले. माजी मंत्री डी पी सावंत यांच्या घरावर सीसीटिव्ही कॅमेरे नाहीये. शिवाय सुरक्षा कर्मचारी त्यांच्याकडे नाही.

मानहानीकारक पराभवानंतर राजस्थानच्या संघात उभी फूट? कुमार संगकाराचे अश्विनवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here