सातारा : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सनपाने गावातील विद्यार्थ्याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. ओंकार पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये झेंडा फडकवला आहे. ओंकारने देशात १९४ वा क्रमांक पटकवला.

ओंकार पवार याचे प्राथमिक शिक्षण हे सनपानेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले होते. तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. ओंकार पवार मागील वर्षी यूपीएससी परीक्षेत 455 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर तो आयपीएस पदावर सध्या रुजू आहे.

UPSC निकाल : वडिलांचं अधुरं स्वप्न लेकीकडून पूर्ण, मराठवाड्यातील मानसीचा देशात डंका
गेल्या दोन वर्षात ओंकारने गावात राहूनच यूपीएससीची सर्व तयारी केली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या ओंकारचे आई-वडील शेती करतात. तो घरातील पहिला अधिकारी झाल्यामुळे संपूर्ण घरात आणि गावात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

ओमकार पवार याने महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनसोबत संवाद साधला. यावेळी बोलत असताना ओंकारने आजच्या तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे. या स्पर्धा परीक्षेत पास होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आजचा तरुण पास झाला नाही तर नैराश्येत जाऊ लागला आहे. त्यामुळे एमपीएससी किंवा यूपीएससी हे आयुष्य नाही हा एक करिअर ऑप्शन आहे. त्यामुळे परीक्षेत पास झालो तरी आपण आयुष्यात फेल होत नाही, हे आजच्या तरुण पिढीने लक्षात ठेवावे, असा सल्ला ओमकार पवार याने दिला आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याच्या लेकीचा UPSC परीक्षेत डंका, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण, आईबापाच्या कष्टाचं पांग फेडलं

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनीही परीक्षेत यश मिळवित पुन्हा आपली गुणवत्ता सिद्ध केली.

पुणे सोडलं, गावात राहून अभ्यास केला; तरी साताऱ्याच्या ओंकारने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं

वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारी मानसी

औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी नरेंद्र सोनवणे हिने परीक्षेत यश मिळवले. पडेगाव येथील रहिवासी असलेले मानसीचे वडिल लेखाधिकारी आहेत तर आईही शसकीय सेवेत आहे. घरची परिस्थिती, माहितीचा अभाव यामुळे नरेंद्र यांना यूपीएससीत यश मिळवता आले नाही. त्यांनी आपले हे स्वप्न कन्या मानसीला बोलून दाखवले. आपल्या वडिलांचे राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करू असा विश्वास अन् ध्येय ठेवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here