परभणी : जिल्ह्यातील एका अंध मुलीचं पालकत्व अमेरिकेतील दाम्पत्याने स्विकारलं आहे. जीवन आशा ट्रस्ट संचलित अशा शिशुगृहातील अंध मुलीचे पालकत्व अमेरिकेतील दाम्पत्याने स्विकारलं असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या मुलीला पालकांच्या ताब्यात दिलं आहे. त्यामुळे आशा शिशुगृहातील अंध बालिका आता सातासमुद्रापार वास्तव्यास गेली आहे.

परभणी शहरातील जीवन आशा ट्रस्ट संचलित आशा शिशुगृहात २०१५ मध्ये ९ महिन्यांची असताना ही मुलगी दाखल झाली होती. मुलीचे संगोपन, संरक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी संस्थेने घेतली. २०१५ नंतर दत्तक प्रक्रिया ऑनलाइन पार पडली. संस्थेला मुलीच्या पुनर्वसनाबाबत काहीतरी साध्य होईल, अशी आशा वाटू लागली. २०१० नंतर संस्थेने बऱ्याच पालकांशी संपर्क ठेवून पुनर्वसनासाठी पाठपुरावा सुरू केला. या मुलीस भविष्यात शैक्षणिक आणि इतर अडचणी येऊ नयेत यासाठी तिला ब्रेल लिपी, स्पर्शज्ञान, अक्षरओळख, आदीबाबत प्रशिक्षित करण्यात आले आहे. २०२१ मध्ये अमेरिकेतील दाम्पत्य रुवे यांनी या मुलीचे प्रोफाईल पाहिले. त्यानंतर तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.

मोठी बातमी: ‘LIC’चा नफा घसरला तरीही महामंडळाने केली लाभांशाची घोषणा
त्यानंतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या मुलीला पालकांच्या ताब्यात दिले आहे. या दत्तक प्रक्रियेसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी के. व्ही. तिडके, बालकल्याण समितीचे अध्यक्ष संजय केकान, आशा शिशुगृहाचे अधीक्षक एस. एम. कसबेकर, नृसिंह मुंडे, धर्मेंद्र कांबळे, आदींनी या कामी प्रयत्न केले. दरम्यान, जिल्ह्यातील आशा शिशुगृहातील अंध बालिका आता सातासमुद्रापार वास्तव्यास गेली आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या सरपंचाला बेदम मारहाण; खोटे गुन्हेही दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here