मुंबई: यूपीएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. श्रृती शर्मा देशातून पहिली आली. तर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. ऐश्वर्या वर्मानं चौथं स्थान मिळवलं. या परीक्षेत महाराष्ट्राची प्रियंवदा म्हाडदळकरनं परीक्षेत तेरावी आली. लातूरच्या रामेश्वर सब्बनवाडनं यूपीएससीमध्ये २०२ वा क्रमांक पटकावला.

लातूरच्या हुंडरगुळी गावच्या रामेश्वरचं शिक्षण नवोदय विद्यालयात झालं. त्यानं पुढचं शिक्षण सीओईपीतून शिक्षण घेतलं. इंजिनीयरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यानं दोन वर्षानंतर नोकरी केली. २०१९ मध्ये यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात रामेश्वरनं मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र त्याचा रँक केवळ सहा गुणांनी हुकला. पण दुसऱ्या प्रयत्नात त्यानं यश मिळवलं.
लहानपणापासून IAS होण्याचं स्वप्न; बँकिंगमधील उत्तम नोकरी सोडली अन् मुलगी अधिकारी झाली
दवाखान्यातील परिस्थिती पाहूनच ठरवलं..
रामेश्वर शिक्षणासाठी कायमच घरापासून दूर राहिला. त्याचं शिक्षण शहरात झालं. एकदा आजारी पडला असताना त्याला गावाकडच्या दवाखान्यात जावं लागलं. तिथली परिस्थिती पाहूनच समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं, असं रामेश्वरनं मनोमन ठरवलं. त्यानंतर तो यूपीएससीच्या तयारीला लागला.

रामेश्वरनं इंजिनीयरिंग केलं होतं. पण वैकल्पिक विषय राज्यशास्त्र असल्यानं त्याला थोडा त्रास झाला. कोरोनामुळे सगळे क्लासेस ऑनलाईन झाले. युट्यूबसारख्या ऑनलाईन माध्यमांचादेखील त्याला फायदा झाला. अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं अवलोकन केलं. खूप मॉक टेस्ट दिल्या, अशा शब्दांत रामेश्वरनं त्याच्या यशाचं रहस्य उलगडलं. अधिकारी होण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

पुणे सोडलं, गावात राहून अभ्यास केला; तरी साताऱ्याच्या ओंकारने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here