पुणे (पिंपरी-चिंचवड) : चित्रपट सृष्टीतील अभिनेते सोशल मीडियावर त्यांची राजकीय मते मांडत असतात. यामुळे ते अनेकदा ट्रोल देखील होतात. याचदरम्यान, ‘चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कोणत्याच कलाकाराने राजकीय भूमिका घेऊन नये. शंभर टक्के मी याच मताचा आहे’, असं मत ‘सरसेनापती हंबीरराव‘ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त करत केतकी चितळेचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.

सरसेनापती हंबीरराव चित्रपटाला यश मिळत आहे…

पिंपरी चिंचवडमध्ये सरसेनापती हंबीरराव चित्रपटाला यश मिळत आहे. यात पिंपरी चिंचवडमधील प्रेक्षकाचा वाटा मोठा आहे. त्यांचे आभार मानत असताना तरडे यांनी सोशल मीडियावर कलाकारांनी व्यक्त होताना काळजी घ्यावी. असा सल्ला देखील दिला आहे. ‘केतकीचे प्रकरण मला माहित नाही, त्यावेळी मी चित्रपटाच्या कामात व्यस्त होतो. पण कोणत्याच कलाकाराने एकाच राजकीय व्यक्तीशी संबंधित भूमिका घेऊ नये’, असं मत तरडे यांनी व्यक्त केलं.

ईडीचा धडाका सुरुच, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक
परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिखट…

प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक कलाकारदेखील हा सिनेमा आवर्जून बघत असून, त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिखट’ असे दमदार डायलाॅग या सिनेमात आहेत. प्रविण तरडे यांची कथा, पटकथा, संवाद, आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा सध्या सोशल मीडियावरू धुमाकूळ घालत आहे.

IPS होऊनही असमाधानी, पठ्ठ्या पुन्हा UPSCला बसला, लेकाचं यश पाहून आईनेही मुका घेतला
सिनेमात गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत…

‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमात गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर प्रविण तरडे स्वत: ‘सरसेनापती हंबीरराव’ची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे.

पहिला प्रयत्न अपयशी, कोरोना काळात रात्रंदिवस अभ्यास; UPSCत शुभम भोसलेची भरारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here