तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करून यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींचे कौतुक केले आहे. UPSC परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या चारही क्रमांकांच्या मानकरी महिलाच आहेत. अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही, हेच यातून पुन्हा अधोरेखित होतंय. लखलखतं यश मिळवलेल्या स्त्री शक्तीला सलाम. यशस्वी उमेदवारांचं अभिनंदन!, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
“कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका केली होती.
सदानंद सुळेंची चंद्रकांत पाटलांवर टीका
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि हे सुप्रिया सुळेंबद्दल बोलत आहेत मला नेहमीच वाटत होतं हे स्त्री द्वेषी आहेत जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय, असे सदानंद सुळे यांनी म्हटले होते.