गांधीनगर : काँग्रेसमधून बाहेर पडलेले गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पटेल हे २ जून रोजी भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश करणार आहेत.

हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना हार्दिक पटेल यांनी पक्षनेतृत्वावर घणाघाती टीका केली होती. तसंच राम मंदिर, कलम ३७० या मुद्द्यांचं समर्थन केलं होतं. त्यामुळे पटेल हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर हार्दिक पटेल यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णा हजारेंच्या आक्रमक इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली; लोकायुक्तसाठी पुण्यात बोलावली बैठक

दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेससमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आगामी काळातही हार्दिक पटेल हे काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

दोन टर्म आमदारकी, कृषीमंत्रिपदी असतानाच पराभव, भाजपने तिकीट दिलेले अनिल बोंडे कोण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here