अहमदनगर : भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पहाटेच अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९७ वी जयंती आहे. या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या कार्यक्रमावर टीका करत राम शिंदे यांनी पहाटेच सहकुटुंब चौंडीतील अहिल्येश्वर मंदिरात जाऊन पूजा केली.
अहल्यादेवी होळकर यांच्या स्मारकात जाऊन अहल्यादेवींना अभिवादन केले. यावर्षी शिंदे चौंडीतील कार्यक्रमात सहभागी न होता मुंबईत कार्यक्रम घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्सव सुरू होण्यापूर्वीच शिंदे यांनी पहाटेच अभिवादन केले. दरम्यान, राम शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. अण्णा हजारेंच्या आक्रमक इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली; लोकायुक्तसाठी पुण्यात बोलावली बैठक या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर भाजप नेते राम शिंदे यांनी जहरी टीका केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला पक्षीय स्वरुप देण्यात आलं असून राष्ट्रवादीने याला मेळाव्याचं स्वरुप दिलं आहे, अशी टीका राम शिंदेंकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या भक्तांची कुचंबणा झाली असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे. राहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीला राजकीय स्वरुप दिल्यानं वादग्रस्त आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.