मुंबई- बॉलिवूडमधील देखण्या अभिनेत्यांमध्ये हृतिक रोशन याचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. परंतु सध्या हृतिक त्याच्या सिनेमांपेक्षा रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत आहे. हृतिक रोशन अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद ला डेट करत आहे. हे दोघं रिलेशनमध्ये असल्यावर आता शिक्कामोर्तबही झालं आहे. बऱ्याचदा ते दोघं लंच किंवा डिनरला एकत्र जाताना दिसतात. इतकंच नाही तर करण जोहरच्या पार्टीमध्ये देखील ते एकत्र गेले होते.

रेप सीन करत होतो आणि मला एकानं विचारलं की… मकरंद देशपांडेंनी सांगितला तो किस्सा

हृतिक रोशन आणि सबा आझाद एकमेकांबरोबर रिलेशनमध्ये आहेत. मात्र, हृतिक आणि सबा या दोघांचही सुझान खानबरोबर खूपच चांगलं बॉन्डिंग आहे. विशेष म्हणजे सबा आझाद आणि सुझान खान यांच्यातही खूप चांगलं बॉन्डिंग झालं आहे. दोघीही एकमेकींना सोशल मीडियावर फॉलो तर करतातच शिवाय एकमेकींनी केलेल्या पोस्टवर कमेन्टही करतात.


अलिकडेच सबानं तिच्या इन्स्टाग्रामवरून फिगर दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला. हा मिरर व्हिडिओ होता. यामध्ये सबानं चॉकलेटी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला असून केस मोकळे सोडले आहेत. त्यात ती खरंच खूप सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सबानं लिहिलं की, ‘व्हिडिओ शेअर करताना त्याला छानसं कॅप्शन मला काही सुचलं नाही.’

हृतिक- सबा

सबानं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तसंच काही कलाकारांनी त्यावर कमेन्ट केल्या. त्यामध्ये सुझान खान हिनं देखील कॉमेन्ट केली आहे. तिनं कॉमेन्टमध्ये लिहिलं आहे की,’वॉव सब्बू..’ असं लिहिलं आहे… सुझान हिनं केलेल्या या कॉमेन्टवर सबानं देखील उत्तर दिलं आहे. सबानं लिहिलं आहे की, ‘धन्यवाद माझ्या सुझलो…’ ही कॉमेन्ट करत तिनं काही इमोजी पोस्ट केले आहेत. या दोघींच्या पोस्टवरून त्या एकमेकांना कोणत्या टोपणनावानं हाका मारतात हे आता समोर आलं आहे.


दरम्यान, करण जोहरनं त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्तानं ठेवलेल्या पार्टीमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनी एकत्रितपणं हजेरी लावली होती. पहिल्यांदाच ते ऑफिशिअली सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. त्यामुळे आता हृतिक आणि सबाने त्यांचे रिलेशनशिप पब्लिकली ऑफिशिअल केले आहेत. यावेळी त्यांनी आउटफिट देखील कलर कॉर्डिनेट करुन परिधान केले होते. त्यांनी ब्लॅक आउटफिटमध्ये करण जोहरच्या पार्टीमध्ये एंट्री केली होती. हातात हात घेऊन त्यांनी कॅमेरासमोर रोमँटिक पोज देखील दिली होती.


हृतिक रोशन आणि सबा आझाद (Hrithik Roshan Saba Azad dating) यांना यावर्षी जानेवारीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले होते, तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी दोघांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र त्यानंतर अनेकदा त्यांना एकत्र पाहिले गेले. अनेकदा सबा हृतिकच्या कुटुंबीयांसह देखील दिसली आहे. हृतिक रोशनच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये देखील सबा दिसली आहे. याशिवाय अनेकदा हे लव्ह बर्ड्स एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स करताना दिसतात. आता हे कपल एकत्र पार्टीमध्ये रोमँटिक अंदाजात दिसल्याने चाहत्यांनी त्यांचे रिलेशनशिप ऑफिशिअल झालं आहे.

२०१४ मध्ये झाला होता हृतिक रोशनचा घटस्फोट

हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी २०१४ साली एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे २००० साली लग्न झाले असून त्यांना दोन मुलं देखील आहे. आता हृतिक सबाला डेट करत असून सुझान देखील अर्सलान गोनी (Arslan Goni) सह रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here