मुंबई: शिवसेना आणि भाजपच्यादृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात आरक्षित वॉर्डांची लॉटरी (BMC Ward) पद्धतीने निवड करण्यात आली. यावेळी मुंबईतील अनेक प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला आहे. अनुसूचित जाती आणि महिला आरक्षणामुळे वर्षानुवर्षे निवडून येत असलेल्या नगरसेवकांना आपले वॉर्ड गमवावे लागले आहेत. सर्वच पक्षांमधील नगरसेवकांना या रचनेचा फटका बसला आहे. त्यामुळे आता संबंधित आरक्षित वॉर्डसमध्ये नवे उमेदवार शोधणे आणि प्रस्थापित नगरसेवकांसाठी दुसरा वॉर्ड शोधणे, अशी दुहेरी कसरत राजकीय पक्षांना करावी लागणार आहे. (BMC Election 2022 ward reservation)

प्राथमिक माहितीनुसार, शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेस नेते आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि बेस्टचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांना यंदा आपला वॉर्ड सोडावा लागणार आहे. अमेय घोले, रवी राजा आणि प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड अनुसूचित वर्गासाठी आरक्षित झाला आहे. याशिवाय, मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांना वॉर्ड क्रमांक ११७ हा देखील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर मुंबईचे माजी महापौर यांनाही त्यांचा वॉर्ड क्रमांक ९६ महिला आरक्षणामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळे आता या सगळ्या नेत्यांना संबंधित पक्ष दुसऱ्या कोणत्या वॉर्डातून उमेदवारी देणार, हे पाहावे लागेल.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना १२५ जागा जिंकेल; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

जाणून घ्या कोणकोणत्या वॉर्डात आरक्षण?

पालिकेकडून आरक्षित आणि अनारक्षित वॉर्डांची यादी जाहीर करण्यात आली. प्रभाग क्रमांक २७.५५ ९५, ९८, १११. १२१, १२४, १२६, १२९, १३७, १४५, १४६, १४७,१५०, १५१,१५२, १५४, १५५ १५६, १५९. १६०, १७५, १७९, १८७, १८९, १९२, १९५, २०२, २०३, २०६, २०७, २१८, २२४ व २३४ हे सन २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणूकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते त्यांना आता वगळण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ६०, ८५, १०७, ११९.१३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५ व २२१ हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. या प्रभागांपैकी सन २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी कोणताही प्रभाग आरक्षित नसल्याने नमूद १५ प्रभागांतून ८ प्रभाग स्त्रियांसाठी सोडतीद्वारे निवडण्यात येतील. ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत होती.

अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आरक्षण- प्रभाग क्र. १३९, १९०, १९४, १६५, १०७, ८५, ११९, २०४

अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग आरक्षण प्रभाग क्र. १२४

महिला सर्वसाधारण आरक्षण सोडत, ४४, १०२, ७९, ११, ५०, १५४, १५५, ७५, १६०, ८१, ८८, १३७, २१७, १३०, २३२, ५३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here