मार्तंड जामकर यांच्या एन्ट्रीनं प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. जामकर यांनी डॉक्टर विरोधात काही पुरावे मिळवले असून त्याच्या आधारे त्याला अटकही केली आहे. डॉक्टरनेच सर्व गुन्हे केल्याचंही त्यांना माहित आहे. पण त्याच्या विरोधात आणखी भक्क पुरावे गोळा करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण मालिकेत आता नवीन ट्विट येणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
सुरुवातीपासून कडक आणि सच्चे दिसणारे हे जामकर डॉक्टरशी डील करणार का? असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत. मालिकेच्या पुढच्या भागात हे पाहायला मिळणार आहे. जामकर डॉक्टरकडे असलेल्या सोन्याची बिस्किटांबद्दल चौकशी करतात.
बिस्किटं कुठं आहेत सांग नाही तर वाड्यावर छापा टाकणार असं सांगतात. यानंतर ते डॉक्टर समोर एक डील ठेवलतात. बिस्किटं कुठं आहेत ते सांग, त्यातली अर्धी बिस्किटं तुझी आणि अर्धी माझी. पैसे देऊन तुझी केस बंद करतो, असं जामकर म्हणतात. जामकरांची ही डील ऐकूण तिथले शिपाई देखील शॉक होतात. पण जामकरांनी ही खेळी नक्की कशी कामाला येईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.