nandurbar news: पेट्रोलची टंचाई, चक्क दुधाच्या कॅनमध्ये डिझेलची साठवण, दूधवाल्या भय्याचा व्हिडिओ व्हायरल – milk man in nandurbar district stored petrol in milk cans
नंदुरबार : राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी आजपासून पेट्रोल आणि डिझेल खरेदी बंद केली असल्याने शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी रात्री मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यातच अनेक ग्रामीण भागातील नागरिक पेट्रोल आणि डिझेल ची साठवणूक करतांना दिसून आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल हा ग्रामीण भागातील एक व्हिडिओ ज्यात चक्क दुधाच्या कॅनमध्ये त्याने डिझेल ची साठवणूक केली असल्याचे दिसून येत आहे .
ही अनोखी शक्कल पाहून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतांना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोल पंपवर या अवलियाने चक्क आपल्या दुचाकीवर दोघी बाजूला दुधाच्या कॅन लावून कॅनमध्ये डिझेल भरताना दिसत आहे. डिझेल भरत असतांना पंपावरील नागरिकांनी ही अनोखी शक्कल पाहून या अविल्याचा व्हिडिओच तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याने दूध डिझेल वाले भय्या चांगलेच चर्चेत येत आहे.