काय आहे प्रकरण?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जीवे मारण्याची धमकी देणारा फोन काल आला होता. दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयातून याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. धमकी देणारा नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा : केतकी चितलेळा समर्थन करणाऱ्यांना रुपाली चाकणकर यांनी सुनावलं
तक्रारीनुसार भाऊसाहेब रामदास शिंदे याला नगरजवळच्या चिचोंडी पाटील येथील ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांचे पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडे या फोनबद्दल प्राथमिक चौकशी केली. त्यावर त्याने केलेले दावे चक्रावून टाकणारे आहेत.
आरोपीचा दावा काय?
‘काही लोकांनी सॅटेलाईटद्वारे माझ्या मेंदूचा ताबा घेतला आहे. सॅटेलाईटद्वारे माझ्या पत्नीलाही त्रास दिला आहे. यासंबंधी आपल्याकडे पुरावे आहेत. त्यानुसार आम्ही महिला आयोगाकडे तक्रारही केली आहे. मात्र, या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आयोगाकडे चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यामुळे का होईना पोलिसांनी मला पकडले आहे. आता मला पोलिस संरक्षण मिळाले आहे तर मी माझी बाजू न्यायालयासमोर मांडू शकेल’ असेही त्याने म्हटले आहे.
हेही वाचा : तिचं मंगळसूत्र काढू नका, कुंकू पुसू नका’; अंत्यविधीवेळी रुपाली चाकणकरांनी पुढाकार घेतला
पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्याची तयारी केली आहे. त्यानंतर सखोल तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
‘विकृत मनोवृत्तीचे हे एक उदाहरण’, रुपाली चाकणकर यांचा राणांना सणसणीत टोला