मुंबई: दोन अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी असू शकत नाही, असं म्हटलं जातं. अभिनेत्रींचं एकमेकींसोबत पटलं नाही, बॉलिवूडमध्ये हे गॉसिपचे विषय ठरलेले असतात. बॉलिवूडमध्ये या कॅटफाइट्स काही नव्या नाहीत. करिना-बिपाशा, राणी- ऐश्वर्या यांची भांडणं सगळ्यांनाच माहित आहेत.
देवमाणूसमध्ये ट्विस्ट! मार्तंड जामकर आणि डॉक्टरमध्ये होणार मोठी डील?
बॉलिवूड करिअर असो किंवा खासगी आयुष्य, कारण काहीही असलं तर अनेकदा अभिनेत्रींमध्ये दुरावा आल्याचं दिसून आलं आहे. काहींनी भांडणं विसरून पुन्हा मैत्री केली तर, काहींनी आयुष्यभरासाठी दूरचा रस्ता पकडला. काही वर्षांपूर्वी अशीच एक कॅटफाइट चर्चेत आली होती. अभिनेत्री ईशा देओल आणि अमृता राव यांची. रागाच्या भरात ईशानं अमृताच्या कानशिलात लगावली होती.
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमला Hridayam च्या रिमेकमधून करण जोहर करणार लाँच?
ईशानं अमृताला कानशिलात लगावल्याचं प्रकरण प्रचंड चर्चेत आलं होतं. यानंतर ईशानं फामी मागण्याऐवजी, मी जे काही केलं त्याचं मला दु:ख नाही, अमृतासोबत हेच व्हायला हवं असं तिनं म्हटलं होतं.

काय आहे घडलं होतं नेमकं?

२००५मध्ये ईशा देओल आणि अमृता राव ‘प्यारे मोहन’ या चित्रपटाचं शूटिंग करत होत्या. शूटिंग दरम्यान अमृतानं ईशाबद्दल वाईट गॉसिप केलं होतं. ईशाला हे सहन न झाल्यानं तिनं थेट अमृताच्या कानशिलात लगावली. हा किस्सा अभिनेत्रीनं स्वत: सांगितला.

एका दिवशी पॅकअपनंतर अमृतानं दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्यासमोर मला शिवी दिली. मला आणि तिथले कॅमेरा मॅन यांना वाटलं की, अमृतानं तिची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळं मी माझा स्वाभिमान राखत तिच्यावर हात उचलला. मला याबद्दल काही वाईट वैगेरे वाटत नाही. असं असलं तरी अमृतानं नंतर माझी माफी मागितली होती, आणि मी तिला माफ केलं होतं, असंही ईशानं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here