Pre Monsoon Rain Update : राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट – pre monsoon rain update in maharashtra rain start in marathwada vidarbha
वर्धा : मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या २४ तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, बीडसह, वर्धा, उस्मानाबाद, नजिकच्या शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, आज मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढग दाटून आले असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सध्या वर्धा शहरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. जोरदार आलेल्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली. वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलमोहरचे मोठे झालं कोसळल्याने रस्ता बंद झाला.
Pre Monsoon Rain Update : राज्यात २४ तासात पावसाची हजेरी; सातार, बीडमध्ये मुसळधारा उस्मानाबाद जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसभरात जाणवत असलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. सोमवारपासूनच हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला होता. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या संपूर्ण आठवड्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे.