मृतदेह बीड जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आलेले आहेत. महामार्गालगत असलेल्या साईडपट्ट्या असलेल्या दुरुस्त नाही, रस्त्यावर खड्डे आणि चढउतार अधिक असल्याने अपघात सातत्याने होतात. समोरासमोर धडक होण्याची कारणे ही साईडपट्ट्या भरलेली नसणे, आवश्यक दिशादर्शक व सूचना फलक नसणे, रस्त्याच्या बाजूची झाडे न तोडणे अशा बऱ्याचं प्रकारची कामे तिथे बाकी आहेत. त्यामुळे आणखी किती लोकांचा जीव गेल्यावर लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष घालणार आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ना लोकप्रतिनिधी लक्ष ना कोणत्या अधिकाऱ्याचं…
मात्र, या अपघातांच्या मालिकानंतर अनेक दुचाकी व चारचाकी प्रवास करणाऱ्या नागरिकांना धक्का बसला आहे. मात्र, याकडे शासन आणि प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी लक्ष घालण्यास तयार नसल्याने अपघाताची मालिका ही किती दिवस सुरू राहणार? हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो आहे. एक ना अनेक प्रश्न या अपघातातच्या दरम्यान पुढे येत आहेत. वेळोवेळी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून देखील या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या अपघातामुळे जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतू, या गोष्टीकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहे ना कोणता अधिकारी.