हिंगोली : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, बीड व परभणीच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. तर पाऊस सुरु झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली शहरात काहीवेळ धो-धो पाऊस पडला आहे. वीजेचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोबतच बीड आणि शहरात काही भागात पाऊस पडला तर ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा सुटला होता. उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतातल्या उभ्या पिकांच्या चिंतेनं शेतकऱ्यांची झोप देखील उडाली आहे. मान्सूनपूर्व सुरू झालेल्या पावसामुळे यंदा वेळेवर खरिपाच्या पेरणीला सुरुवात होईल, असा अंदाज बांधला जात आहे. मराठवाड्यात सध्या शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पेरणीची तयारी सुरू आहे. तसेच हळद उत्पादक शेतकरी गुढी पूर्वीची अंतर्गत मशागत करताना दिसत आहेत. हनुमान जन्मस्थळ वाद; महंतांचा सभेत राडा, गोविंदानंद सरस्वतींवर माईक उगारला त्याचबरोबर, आज झालेल्या अचानक पावसामुळे घराबाहेर पडलेल्यांची धांदल उडाली आहे. शहरात देखील घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या संख्येत शेंगा विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडताना पाहायला मिळाली. पावसामुळे शेतकरी भुईमूग शेंगा वाचण्यासाठी मेणकापड टाकताना दिसले.