मुंबई : केरळमध्ये मान्सून नियमीत वेळेच्या ३ दिवस आधी दाखल झाल्याने मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मान्सूनचा पाऊस केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बऱ्याच भागात पोहचलेला आहे. पुढील २-३ दिवसात मान्सून कोकण-गोवापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत वायव्य राजस्थान, हरियाणा, उ.प्र. बिहार, बंगामध्ये द्रोणीय स्थिती आहे. केरळ आणि सभोवताली ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा रीतीने पूर्व नियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले आहे.