ठाणे : डोंबिवलीतील कासा रिओ गोल्ड अपार्टमेंटमध्ये एका प्रियकराने काल 30 मे रोजी पहाटे दीडच्या सुमारास प्रेयसीची आधी तिच्या घरात हत्या करून नंतर पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. ललिता सुरेश काळे (२८) या डोंबिवलीतील कासा रिओ गोल्ड आणि अनिल साळुंखे (३३ रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक मधील वडनेर भैरवमध्ये राहणाऱ्या अनिल साळुंखे याचे डोंबिवली मधील या २८ वर्षीय तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र, अनिल हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती ललिता हिच्या कुटुंबीयांना मिळाल्याने कुटुंबियांनी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले आणि काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा देखील झाला. मात्र, आपली प्रेयसी दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करत असल्याचे अनिल याला सहन झाले नाही. याच रागातून २९ मे रोजी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास ललित तिला शेवटचे भेटण्याच्या निमित्ताने तिच्या घरी पोहचला.

पतीसोबत अफेअर असल्याचा संशय; पत्नीनं ५ जणांना पैसे देऊन बलात्कार करायला लावला
त्यानंतर रागाच्या भरात त्याने ललिताचा नायलॉन दोरीने गळा आवळला एवढ्यावरच न थांबता त्याने उशीने नाक तोंड दाबून तिची हत्या केली. यानंतर त्याच नायलॉन दोरीने त्याने स्वता पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, सकाळी ११ वाजता हाका मारूनही बहिण दरवाजा उघडत नसल्याने ललिता हिच्या बहिणेने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ? मिनिटांत करा माहित, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here