Girish Mahajan | राज्यसभेची तिसरी जागा आम्ही हमखास जिंकणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही घोडेबाजार करणार नाही, असे महाजन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपने निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्याचा संजय राऊत यांचा आरोपही फेटाळून लावला. भाजपने बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली, असे संजय राऊत म्हणतात. पण आमच्याकडे बोट दाखवताना हाताची इतर चार बोटं तुमच्याकडे आहेत, हे लक्षात असू द्या.

हायलाइट्स:
- संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत
- दररोज सकाळी हा भोंगा वाजतो
- कधीच राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नांविषयी बोलत नाही
यावेळी गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत. दररोज सकाळी हा भोंगा वाजतो. ते कधीच राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत, असे महाजन यांनी म्हटले. त्यामुळे आता या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्यु्त्तर दिले जाईल, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
तसेच गिरीश महाजन यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचाच विजय होईल, असा दावा केला. भाजपने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. राज्यसभेची तिसरी जागा आम्ही हमखास जिंकणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही घोडेबाजार करणार नाही, असे महाजन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपने निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्याचा संजय राऊत यांचा आरोपही फेटाळून लावला. भाजपने बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली, असे संजय राऊत म्हणतात. पण आमच्याकडे बोट दाखवताना हाताची इतर चार बोटं तुमच्याकडे आहेत, हे लक्षात असू द्या. यापूर्वी शिवसेनेने राजकुमार धूत, प्रितीश नंदी, संजय निरूपम आणि प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली होती. हे कोणते निष्ठावंत शिवसैनिक होते, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : shivsena will face worst situation than ncp and congress says bjp leader girish mahajan slams
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network