या स्पर्धेत भारतासह २४ देशांमधील १४० खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्यात १७ ग्रँडमास्टर्स, महिला ग्रँडमास्टर्स आणि २९ आंतरराष्ट्रीय मास्टर्स खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत २ हजार पेक्षा जास्त एलो गुणांकन असलेल्या खेळाडूंचा सहभाग आहे.
कोणताही खेळ खळताना त्यातील खाचाखोचा नीट समजावून घ्या, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला अनेक ग्रँडमास्टर दिले आहेत आणि आता युवा खेळाडू तोच वारसा पुढे चालवत आहेत. या स्पर्धेतील खेळाडूंचा भरघोस सहभाग पाहून मला खूपच आनंद होत आहे. फिडे नियमानुसार ही स्पर्धा होत असल्याने अनेकांना या स्पर्धेतून ग्रँडमास्टर किंवा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवण्याची संधी आहे. खिलाडू वृत्ती, खेळभावना आणि स्पर्धात्मकता हे गुण ज्याच्याकडे असतात, तो स्पर्धाही जिंकतो आणि खर्या आयुष्यातही यश मिळवतो.
बुद्धिबळ आणि राजकारणात आपल्याला समोरील खेळाडूच्या डोक्याचा आभ्यास करता येणे फार महत्त्वाचे असते. मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच भागातील असल्याने अनेक खेळ आम्ही नागपूर महानगरपालिकेत देखील एकत्र खेळलो आहे, असं यावेळी सुनील केदार यांनी सांगितलं.
दरम्यान, खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे सराव व प्रशिक्षण शिबीर चालू असल्याचे सांगून सुनील केदार म्हणाले की, या सगळ्याचा पुरेपूर फायदा खेळाडू निश्चितच करून घेतील. महाराष्ट्रात या वर्षअखेरपर्यंत अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे क्रीडा विद्यापीठ सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस जेव्हा कपिल देवसोबत क्रिकेट खेळतात तेव्हा…