K K passes away | ३१ मे रोजी कोलकातातील एका कॉन्सर्टमध्ये ते सहभागी झाले होते. त्या कॉन्सर्टचे व्हिडिओ त्यांच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये केके हम रहे या ना रहे कल हे गाणं गाताना दिसत आहे. मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी केके यांनी हे गाणं म्हटलं होतं. या व्हायरल व्हिडिओमुळं त्यांचे चाहते सुन्न झाले आहेत.

हायलाइट्स:
- सामान्य चाहत्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनाही के.के. यांच्या निधनाचा धक्का बसला आहे
- केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणना होत असे
सामान्य चाहत्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनाही के.के. यांच्या निधनाचा धक्का बसला आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुण्ठ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध गायक म्हणून त्यांची ओळख कोणीही पुसू शकणार नाही. या सदाबहार गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली, असे उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
३१ मे रोजी कोलकातातील एका कॉन्सर्टमध्ये ते सहभागी झाले होते. त्या कॉन्सर्टचे व्हिडिओ त्यांच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये केके हम रहे या ना रहे कल हे गाणं गाताना दिसत आहे. मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी केके यांनी हे गाणं म्हटलं होतं. या व्हायरल व्हिडिओमुळं त्यांचे चाहते सुन्न झाले आहेत.
नव्वदीच्या दशकात बॉलीवूड गाजवले
केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणना होत असे. त्यांनी अनेक भारतीय भाषांमधील गीतांना आपला आवाज दिला आहे. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या यारो या गाण्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही’ हे केकेंचे गाणे गाजले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network