पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश शिंगाडे याच्याविरुद्ध २०१६ मध्ये एक गुन्हा दाखल होता. काही महिन्यांपूर्वी तो कारागृहाबाहेर आला होता. शिंगाडे हा सोमवारी सायंकाळी फुरसुंगी येथील भेकराई बस डेपोशेजारील श्री मल्टीपर्पज हॉलच्या समोर असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केला. त्याच्या तोंडावर व डोक्यावर सपासप वार करुन त्याचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात मंगेश तेथे पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक दिंगंबर शिंदे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
दरम्यान, शिंगाडे याच्या खूनाची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत पथकाला माहिती मिळाली होती की, शिंगाडे याचा खून किरण, प्रशांत व अजय या तिघांनी केली असून सध्या ते लोणी टोलनाका येथे थांबले आहेत. तेथून ते प्रशांत याच्या कर्नाटकातील मूळ गावी जाणार आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, कर्मचारी अकबर शेख, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत, दोन दिवसांपूर्वी आरोपी आणि शिंगाडे यांच्यात वाद झाल्याचं स्पष्ट झालं. या वादावेळी शिंगाडे याने आरोपींना शिवीगाळ केली होती. त्यातूनच तिघांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास शिंगाडे याला गाठून त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
हृदय हेलावणारी घटना; ६ मुलांसह महिलेची विहिरीत उडी; मुलं दगावली, ती बचावली