नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना आता सर्वसामान्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. LPG सिलेंडर (स्वयंपाकाचा गॅस) च्या किंमतीत आज ०१ जून रोजी मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (१९ किलो) किंमत प्रति सिलेंडर १३५ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून हे नवीन दर लागू करण्यात येणार आहे.

आता व्यावसायिक सिलिंडरचे भाव इतके वाढले आहेत

या बदलानंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २,२१९ रुपयांवर पोहोचली आहे. याआधी हे सिलेंडर २,३५४ रुपयांना मिळत होते. याप्रमाणे कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,४५४ रुपयांवरून २,३२२ रुपयांवर, मुंबईत २,३०६ रुपयांवरून २,१७१.५० रुपयांवर आणि चेन्नईमध्ये २,३७३ रुपयांवरून २,५०७ रुपयांवर आली आहे. सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळणार आहे.

शेकडो लोन अॅप्स होणार ब्लॉक; मुंबई पोलिसांनी दिल्लीला पाठवली यादी
गेल्या महिन्यात दोनदा वाढले भाव

याआधीही गेल्या महिन्यात १९ तारखेला घरगुती एलपीजी सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात ३.५० रुपयांनी तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. याआधीही मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात एकदा वाढ करण्यात आली होती.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वारंवार वाढ होत आहे. यामुळे जूनच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढतील, असं समजलं जात होतं. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासह इतर काही घटकांचा कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा जगभरात डिझेल, पेट्रोल, एटीएफ, एलपीजी आदी महाग झाले आहेत.

Breaking अर्थचक्र सुस्साट! करोनावर मात करत अर्थव्यवस्थेचा टॉपगिअर, जीडीपी ८.७ टक्क्यांवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here