Nilam Gorhe vs Ajit Pawar | पुण्यातील इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यात घडलेल्या एका किस्स्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. पुण्यात बुधवारी सकाळी इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अजितदादा (Ajit Pawar) आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कार्यक्रमस्थळी पोहोचले. या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यादेखील उपस्थित राहणार होत्या.

 

Nilam Gorhe Ajit Pawar
निलम गोऱ्हे आणि अजित पवार

हायलाइट्स:

  • तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, अतिश्य कार्यक्षम आहात
  • नऊच्या कार्यक्रमासाठी पावणेनऊला पोहोचलं तर अजितदादा साडेआठला आलेले असतात
  • याचा अर्थ आम्ही उशीरापर्यंत झोपतो, असे नाही
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी भल्या पहाटेच घराबाहेर पडतात, ही बाब एव्हाना नवीन राहिलेली नाही. मात्र, त्यांच्या याच सवयीमुळे पुण्यातील इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यात घडलेल्या एका किस्स्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. पुण्यात बुधवारी सकाळी इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कार्यक्रमस्थळी पोहोचले. या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यादेखील उपस्थित राहणार होत्या. मात्र, त्या येण्यापूर्वीच हा कार्यक्रम सुरु झाला. त्यानंतर या कार्यक्रमात निलम गोऱ्हे आणि अजितदादांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

निलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांना शाब्दिक चिमटे काढले. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, अतिश्य कार्यक्षम आहात. आमच्या अनेक प्रश्नांना तुम्ही वेगाने न्याय मिळवून देता. पण तुमचा कार्यक्रम पुण्यात असतो तेव्हा मी विचार करते की, आयोजकांना सांगावं का, आदल्या दिवशी आमची झोपायची व्यवस्था इकडे करा. आम्ही तुमच्यापेक्षा कितीही लवकर यायचा प्रयत्न केला तरी तुम्ही आमच्या आधीच येता. नऊच्या कार्यक्रमासाठी पावणेनऊला पोहोचलं तर अजितदादा साडेआठला आलेले असतात. इतके ते कार्यक्षम आहेत. पण याचा अर्थ आम्ही उशीरापर्यंत झोपतो, असे नाही, असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले.
पुण्यात विद्यार्थिनीचे मार्क्स ऐकून अजित पवारांनी हात जोडले आणि चांगलाच हशा पिकला!
यानंतर अजित पवार भाषणासाठी उभे राहिले. यावेळी अजितदादांनी निलम गोऱ्हे यांच्या प्रत्येक आक्षेपाला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मी इथे लवकर आलो पण नऊ वाजेपर्यंत थांबायचे ठरवले होते. त्यामुळे आम्ही गोल खुर्च्या मांडून गप्पा मारत होतो. अनिल परब हेदेखील आमच्यासोबत होते. निलमताई, तुम्ही अगदी योग्य वेळेत कार्यक्रमाला आलात. तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो. पण नंतर परब साहेबच म्हणाले की, कार्यक्रम सुरु करा. मी त्यांनी सांगितलं की, निलमताई येतील, त्या उभसभापती आहेत, आपण थांबले पाहिजे. पण परब साहेबांनीच ऐकलं नाही, म्हणाले कार्यक्रम सुरु करा. आता ते शिवसेनेचे आहात, तुम्हीही शिवसेनेच्या आहात, तेव्हा तुमचं तुम्ही बघून घ्या, असे अजितदादांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp ajit pawar and shivsena nilam gorhe verbal exchange in pune electric bus inauguration event
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here