पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात एका आठ वर्षीय मुलीने धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. खेळण्यातल्या बाहुलीला फाशी दिल्यानंतर एका अल्पवयीन मुलीने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवार २९ मे रोजी दुपारी घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सगळेच जण यामुळे सुन्न झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कमळ खेम साउद असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. संबंधित मुलगी आपल्या खोलीत खेळत होती. तिचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आई घरातल्या कामात व्यस्त होती. खेळता-खेळता कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून त्या बाहुलीला फाशी दिली. तिच्या मनात बाहुली आपल्याला सोडून गेली. त्या विचारात तिनेही घरामध्ये असणाऱ्या खिडकीला दोरी लावून गळफास घेतला. काही वेळाने आईने पाहिल्यानंतर मुलीने गळफास घेतल्याचे तिच्या लक्षात आले.

Weather Alert : पुढच्या ५ दिवसांत अतिवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना हवामानाकडून अलर्ट
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलगी हॉरर चित्रपट पहात असल्याचा संशय व्यक्त करत तिने हा प्रकार केल्याचे वाकड पोलिसांकडून प्रथम दर्शनी सांगण्यात आले आहे. एका सुरक्षा रक्षकाच्या मुलीने हा प्रकार केल्यानेच समोर येत आहे. तिचे वडील ज्या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्याच ठिकाणी ते कुटुंबीय मुलीसह राहत होते. असा प्रकार उघडकीस आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे तर वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

खरंतर, काही दिवसांपासून अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या आणि हत्येच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहे. त्यातून मुलांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं समोर येतं. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पालकांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. इतकंच नाहीतर तर आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, त्यांना टीव्ही आणि मोबाईलद्वारे काय दाखवतो हेदेखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. याची प्रत्येक पालकाने काळजी घेतली पाहिजे.

LPG Gas Price : आनंदाची बातमी, गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त; वाचा नवे दर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here