आम्ही मुरादाबादच्या नवाबपुरा भागात करोना रुग्णाच्या कुटुंबातील ४ जणांना आणण्यासाठी गेलो होतो. आम्ही त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये बसवताच काहींनी आम्हाला घेरलं आणि वाद घालत आमच्यावर हल्ला केला. तिथे उपस्थित असलेल्या वृद्धाने पुढे येऊन आमचा जीव वाचवला. यानंतर काही वेळाने तिथे पोलीस आले’, असं हल्ल्यातून बचावलेल्या डॉ. एस.सी. अग्रवाल यांनी सांगितलं.
अॅम्ब्युलन्सला घेरत दगडफेक केली
मुरादाबामध्ये मंगळवारी रात्री उशिरा एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी बुधवारी डॉक्टरांचं पथक त्यांना घेण्यासाठी गेलं होतं. यावेळी अॅम्ब्युलन्स त्यांना घेऊन निघताच दगडफेक सुरू झाली. अनेकांनी अॅम्ब्युलन्सला घेरलं आणि दगडफके सुरू केली. अॅम्ब्युलन्समधून डॉ. अग्रवाल यांना खेचून त्यांना मारहाण सुरू केली. दगडफेकीत अॅम्ब्युलन्ससह पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले. यात डॉक्टरांसह तीन जण जखमी झाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय सुरक्षा काद्यांतर्गत दोषींवर कारवाईचे आदेश दिलेत. दोषींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात कारवाई केली. पोलिसांनी काही महिलांना ताब्यात घेतले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times