corona cases in maharashtra: Covid Cases Rised in Maharashtra 11 ward Covid hot spot in Mumbai | महाराष्ट्रात वेगाने वाढतोय करोना, मुंबईतली ११ ठिकाणं आहेत हॉटस्पॉट
मुंबई : राज्यात आता कुठे करोनाचा धोका कमी झाला होता. यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. पण या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पण यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊ, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहे.
मुंबईतल्या अनेक ठिकाणी सध्या करोनाची जास्त प्रकरणं आढळून येत आहेत. पालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतले ११ वॉर्ड सध्या करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. इथं वारंवार करोनाची नवीन प्रकरणं आढळून येत आहेत. इतकंच नाहीतर या वॉर्डांमधील करोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज ३०० हून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. पिंपरीत मन सुन्न करणारी घटना, बाहुलीला फाशी दिल्यानंतर ८ वर्षीय मुलीची आत्महत्या अधिक माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे, खार, कुलाबा, परळ, अंधेरी, एलफिंस्टन, माटुंगा, ग्रँट रोड, गोरेगाव, चेंबूर आणि कुर्ला या ठिकाणी करोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत. या भागातील करोना रुग्णांचा साप्ताहिक वाढीचा दर ०.०२८ टक्के ते ०.०५२ टक्के आहे, तर मुंबईचा सरासरी साप्ताहिक वाढीचा दर ०.०२६ टक्के आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी करोनाची ७११ नवी प्रकरणं समोर आली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रकरणांमुळे महाराष्ट्रात एकूण करोनाची ७८,८७,०८६ प्रकरणं आहेत. काल एकाचा मृत्यू झाला तर मृतांची संख्या वाढून १,४७,८६० झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ३,४७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे.