मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath Death) उर्फ केके यांनी ३१ मे रोजी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने कोलकातामध्ये सुरू असणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ही घटना (Krishnakumar Kunnath Passes Away) घडली. मंगळवारी रात्री साधारण १०.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके यांच्या जाण्याने संपूर्ण संगीतविश्वाची न भरुन निघणारी हानी झाली आहे. केवळ संगीतच नव्हे इतर क्षेत्रातील दिग्गजांनी देखील केके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केके यांचं जाणं अनेकांसाठी अजूनही न पटणारी गोष्ट आहे.

हे वाचा-‘स्पॉटलाइट बंद करा…’ अस्वस्थ वाटल्याने अखेरच्या क्षणी काय म्हणाले होते केके?

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक बादशाह याने देखील केके यांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर केली होती. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केके यांचा फोटो पोस्ट करत त्याला केवळ ‘WHY?'(का?) एवढे कॅप्शन दिले आहे. तर हार्टब्रेकची इमोजी देखील त्याने पोस्ट केली आहे. केके यांचा कॉन्सर्टमधीलच एक फोटो बादशाह याने पोस्ट केला आहे.

Badshah on Singer KK

‘केके’ यांच्यासंदर्भात बादशाहने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे

दरम्यान केके यांच्या आठवणीत केलेल्या या पोस्टनंतर बादशाहने आणखी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये एका इन्स्टा युजरने बादशाहला एक संतापजनक सवाल केला आहे. त्या युजरने बादशाहला विचारले आहे की, ‘तू कधी मरणार?’ बादशाहने हा स्क्रीनशॉट शेअर करत असे म्हटले आहे की, ‘तुम्हाला केवळ कल्पना देतोय की कोणत्या प्रकारच्या द्वेषाला आम्हाला दर दिवशी सामोरे जावे लागते.’

Badshah Insta Story

‘तू केव्हा मरणार?’असा सवाल एका युजरने बादशाहला विचारला आहे

बादशाह होतोय ट्रोल
मीडिया रिपोर्ट्सनुसार बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायकाला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे. बादशाह केके यांना सोशल मीडियावर फॉलो करत नाही. त्यामुळे आता केके यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर बादशाह त्यांच्याबाबतीत स्टोरी का पोस्ट करत आहे, अशा आशयाचे सवाल चाहते विचारत आहेत.

हे वाचा-केके यांच्याबरोबर मुंबईला येणार होते जीत गांगुली, म्हणाले, असे कसे मला सोडून गेले?

दरम्यान लेटेस्ट अपडेटनुसार गायक केके यांचे पार्थिव एसएसकेएम इस्पितळात आणण्यात आलं आहे. कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांचं शवविच्छेदन केलं जाईल. अहवालाच्या आधारे, पोलीस केस लक्षात घेऊन, शवविच्छेदनाची प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here