जालना : लाच घेताना पकडले जाऊ नये म्हणून मंठा तालुक्यात दोन तलाठ्यांनी चक्क फोन-पेच्या माध्यमातून ३० हजार रुपयांची लाच घेतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे अशी या दोघा तलाठ्यांची नावे आहेत.

मंठा तालुक्यातील उमरखेड येथील तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगरूळ येथील मंगेश लोखंडे यांनी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. यावेळी तक्रारदाराने वाळू वाहतूक करण्याची रितसर पावती (रॉयल्टी) तलाठ्यांना दाखवली होती. मात्र पावतीवर खाडाखोड आहे, ही पावती चालत नाही, असा दम देऊन ५० हजारांचा दंड भर नाहीतर तुझ्यावर कारवाई करावी लागेल, अशी धमकी या दोन्ही तलाठ्यांनी तक्रारदाराला दिली होती.

‘नीलमताई, तुमच्यासाठी थांबलो होतो, पण परबांनी ऐकलं नाही; तुम्ही शिवसेनावाल्यांनी आपापलं बघून घ्यावं’

या प्रकरणात तडजोड करायची असेल तर ३० हजार रुपये दे, अशी ऑफर तलाठ्यांनी दिली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने दोन्ही तलाठ्यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही तक्रारीची खातरजमा करत सापळा रचला आणि काल मंगळवारी (३१ मे) तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे यांना रंगेहाथ पकडले. लाचेचा प्रकार पाहून लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पथकही चक्रावले. कारण या दोन्ही तलाठ्यांनी फोन-पे च्या माध्यमातून तक्रारदाराकडून लाच घेतली होती.

दरम्यान, मंठा पोलीस ठाण्यात दोन्ही तलाठ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्रीतिबंधक विभागाचे पथक करत आहे.

आव्हाडांसाठी पोलिस धावत आला आणि बोलेरोवाल्याच्या कानाखाली लगावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here