यांत्रिकी शेती करणे, चिरेखाण यासारखी अंग मेहनतीची कामं सोपी करण्यासाठी आता विविध प्रकारची मशिन उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मनुष्य बळही वाचते, आणि कष्टकऱ्यांचे श्रमही वाचतात. पण यासारखी मशिन वापरताना काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. कारण जराशी हलगर्जी बाळगली, तरी एखाद्याच्या जीवावर बेतू शकते किंवा गंभीर दुखापतही होऊ शकते.
काय आहे प्रकरण?
रवि बापू जाधव (वय ३५ वर्ष, मूळ रा. सोलापूर, सध्या रा. चवे फाटा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत राजू छाजू चव्हाण (वय २ वर्ष, रा. चवे फाटा, रत्नागिरी) यांनी जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली.
हेही वाचा :
नेमकं काय घडलं?
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 29 मे रोजी चवे येथील चिरे खाणीवर मशीन चालवणारा ऑपरेटर विनोद शिंदे फोनवर बोलत होता. त्याआधी त्याने मशीन बंद केले होते. परंतु मशीन चालवता येत नसतानाही रविने ते सुरु केले.
हेही वाचा : VIDEO | पैशांचा माज! कार चालवताना नोटांची बंडलं उडवली, पोलिसांनी अद्दल घडवली
मशीन सुरु करताच मशीनसोबत रवि उडाला आणि त्याचा पाय कापला गेला. रविला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान रात्री 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जयगड पोलीस करित आहेत.
हेही वाचा : ताईची अब्रू वाचवताना अल्पवयीन भावाकडून खून, बहिणीच्या डायरीने ३ वर्षांनी उकललं गूढ
नांदेडमध्ये महिलेचा रसवंती यंत्रात पदर अडकून मृत्यू
दरम्यान, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच रसवंती यंत्रात पदर अडकून महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना नांदेडमध्ये समोर आली होती. मूळ हिंगोलीच्या असलेल्या ४० वर्षीय दुर्गा खोंड रसवंती गृहात ऊसाचा रस विकून उदरनिर्वाह करत होत्या. मात्र काम करताना यंत्रात पदर अडकल्यानंतर त्यांना प्राण गमवावे लागले होते.
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद सभेच्या तयारीला सुरुवात; सभामैदानात शिवसेनेच्या वतीने स्तंभ पूजन
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times