ती पुढं सांगते, की लग्नाची कल्पना माझ्या मनात पक्की रुजलेली आहे आणि एका घटनेमुळे ती नष्ट होऊ शकत नाही. मी लखनौची असून, एकत्र कुटुंबपद्धतीत वाढले आहे. आई-वडिलांसह पणजी-पणजोबा, आजी-आजोबा, काका-काकू यांच्यासोबत लहानाची मोठी झाले. ज्यांनी संपूर्ण आयुष्य आनंदी वैवाहिक जीवन जगलं. माझा विवाहसंस्थेवर विश्वास आहे आणि मला माहीत आहे, की तुम्हाला समजून न घेणाऱ्या जोडीदारासोबत पहिलं लग्न होऊ शकतं आणि यात कोणाचाही दोष नसतो. मात्र,
आधीच्या जोडीदाराच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत. मीही त्यांचं भलंच इच्छिते. मैत्री या नात्यानं एकमेकांच्या मदतीला आम्ही हजर असू. एखाद्याविषयी तिरस्कार व नकारात्मक दृष्टिकोन घेऊन जीवन जगण्यात काहीच अर्थ नसतो.’
वयाच्या १८व्या वर्षी लग्न झालेल्या कनिकानं तमाम मुलींच्या पालकांना विनंती केली आहे, की त्यांनी मुलगी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईपर्यंत तिचं लग्न करू नका. माझं लहान वयातच लग्न झालं, तेव्हा विवाहसंस्थेचा अर्थ फारसा ज्ञात नव्हता. आज मी लग्नसंस्थेला अधिक चांगल्या प्रकारे समजलं आहे. लग्न करण्यापूर्वी प्रत्येक मुलगी सुशिक्षित आहे आणि ती स्वतःच्या पायावर उभी आहे, याची खात्री पालकांनी करावी; कारण ज्या क्षणी तुम्ही कुणावर तरी अवलंबून असता, त्या क्षणी तुम्ही नेहमी अपेक्षा घेऊन जगत असता. समोरची व्यक्ती तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसेल, तर नैराश्य येतं. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं ही आजच्या स्त्री सबलीकरणाची गरज आहे. भविष्यात माझ्या मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, सभ्य, नम्र असतील; तसेच कुणीतरी येऊन आपलं बिल भरतील याची वाट नक्कीच पाहणार नाहीत.’