सांगली : मुलाने जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील कुरळप येथे घडली आहे. सुरेश भीमराव पाटील असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून वडिलांच्या हत्येनंतर मुलगा प्रथमेश पाटील हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. भर चौकात घडलेल्या खुनाच्या घटनेने गाव हादरून गेलं आहे. वडिलांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळल्यामुळे मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

सुरेश भीमराव पाटील हे गावातील एका खासगी दूध संस्थेत सचिव म्हणून अनेक वर्षांपासून काम करत होते. त्यांना पूर्वीपासून दारूचे व्यसन होते .दारूच्या व्यसनामुळे पाटील कुटुंबात सतत भांडण व्हायचं. या त्रासाला कंटाळून १५ वर्षांपूर्वी पाटील यांच्या पत्नीने पेटवून घेत आत्महत्या केली होती. पाटील यांना एक मुलगा व मुलगी आहे. आईच्या मृत्यूनंतर मुलांचा संभाळ हे आजी-आजोबा करत होते. मात्र सुरेश पाटील यांचे दारूचे व्यसन आणखी वाढले होते. पत्नीच्या निधनानंतर मुलांना आणि संबंधित नातेवाईकांना सुरेश पाटील यांच्याकडून त्रास सुरू होता.

मशिनसोबत उडाला आणि पाय कापला, रत्नागिरीत ३५ वर्षीय तरुणाचा करुण अंत

दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून मंगळवारी मुलगा प्रथमेश पाटील याने थेट वडील सुरेश पाटील यांचा खून केला. गावात असणाऱ्या कट्ट्यावर वडील सुरेश पाटील हे दारू पिऊन बसले असता, प्रथमेशने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. जखमी अवस्थेतील सुरेश पाटील यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेलं जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर प्रथमेश हा पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास कुरळप पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here