हिंगोली : वसमत शहरातील शुक्रवार पेठ भागात एका अल्पवयीन मुलीचा सिनेमा स्टाईल दुचाकी वाहनावर पाठलाग करून तिचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच मुलीला रस्त्यावर पाडून जखमी केल्याप्रकरणी दोघांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीवर पाठलाग करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील एक अल्पवयीन मुलगी रविवारी (२९) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ भागातून घराकडे पायी जात होती. यावेळी शहरातील शहनवाज व जैद पठाण या दोघांनी दुचाकी वाहनावर त्या मुलीचा पाठलाग केला. यावेळी शहनवाज याने मुलीला अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला. तर जैद पठाण याने त्या मुलीचा स्कार्फ ओढल्याने मुलगी खाली पडून जखमी झाली. त्यानंतर या दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या मुलीने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला.

कोण आहे लावण्या; जबरा फॅनला भेटण्यासाठी धोनी विमानतळावर थांबला
पोलीस पुढील तपास करत आहेत…

कुटुंबीयांनी मुलीसह थेट वसमत शहर पोलीस ठाणे गाठून मंगळवारी (३१) रात्री तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शहानवाज व जैद पठाण या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे, उपनिरीक्षक महिपाळे पुढील तपास करीत आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! जूनमध्ये महागाई भत्ता वाढणार, कसा ते जाणून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here