मुंबई: लोकप्रिय पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ केके यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं कोलकाता इथं निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. केके यांच्या निधनानं संगित क्षेत्र तसंच सिनेसृष्टीला मोठा धक्काबसला आहे. चाहते आणि इतर सेलिब्रिटी या सर्वांवर हा मोठा आघात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेमांगीनं तिच्या कॉलेजच्या दिवसांत केकेच्या गाण्यांनी दिलेली साथ यासांरख्या आठणींना उजाळा दिला आहे.
‘मैं मर जाऊं यहीं पे’ केके यांचं कॉन्सर्टमधील ते वाक्य ठरलं खरं, धक्कादायक VIDEO आला समोर
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी केके यांच्या निधणावर शोक व्यक्त केलाय. अभिनेत्री हेमांगी कवी हिनं देखील एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तरुणाईच्या भावना तिनं तिच्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

काय आहे हेमांगीची पोस्ट?
शाळा संपून कॉलेज मधल्या नवनवीन हवेत ‘यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल’ या गाण्यांवर तरंगायला लागलो पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्या सारखं झालं. नव्वदीच्या दशकातील लोकांना कळेल मी काय म्हणतेय ते. काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, time travel सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा घेऊन गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here