व्हरायटी चौकात नाकेबंदीदरम्यानच तिथे तैनात पोलिस उपनिरीक्षक गणेश भोयर यांचा वाढदिवस व्हायोलिनच्या सुरात साजरा झाला. यावेळी भोयर यांच्यावर उपस्थितांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. बंदोबस्तात तैनात असताना अशाप्रकारे वाढदिवस साजरा होईल, अशी पुसटशीही कल्पना भोयर यांना नव्हती. त्यामुळे अचानक अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या वाढदिवसाने उपनिरीक्षक भोयर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
सहयोग ट्रस्टचे विश्वस्त रवींद्र भुसारी, स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष संदेश सिंगलकर, व्हायोलिन वादक अजय वेखंडे, मिमिक्री कलाकार चिन्मय देशकर यांनी बुधवारपासून संपूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोज व्हायोलिन वाजवून पोलिसांना तणावमुक्त करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गतच बुधवारी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तैनात पोलीस उपनिरीक्षक भोयर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचा व्हिडिओही बुधवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times