मुंबई: कित्येक जणांचं कॉलेज आयुष्य , तरुणपण ज्या गाण्यांनी जीवंत केलं, तो आवाज आज हरपला. प्रसिद्ध गायक केके याचं निधन झालं. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सोशल मीडियावर भावुक पोस्टचा पूर आलाय. यातच नेहमी मजेशीर आणि हसवणारे मीम्स व्हायरल करणाऱ्या मीमर्सनी आज मात्र काहीसं भावुक केल्याचं पाहयला मिळत आहे. सोशल मीडियावर काही भावुक करणारे मीम्सही व्हायरल झाले आहेत.
बॉक्स ऑफिसवर मराठीची आघाडी; तर बॉलिवूडची पिछाडी!यमा तुला कधीच माफ करणार नाही…केके यांच्या निधनानं मराठी अभिनेत्रीला धक्का

मीम

केके हे ९० च्या दशकातील प्रसिद्ध आणि लाडके गायक आहेत. त्यांनी ‘प्यार के पल’ हे गाणं गावून प्रत्येक तरुणाच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं होतं.

मीम

केकेंचं ‘यारों’ हे गाणंही प्रचंड गाजलं. इतकी वर्षे उलटून गेली असली तरी, मैत्रीचं नातं या गाण्याशिवाय अपूरं आहे. त्यामुळं मीमर्स या लाडक्या गायकाला मीम्सच्या रुपात आगळी वेगळी श्रद्धांजली वाहत आहेत.

अन् तरुणाईचा आवाज हरपला…
केके याचं रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. कोलकत्यात गुरुदास कॉलेजतर्फे आयोजित नजरुल मंच कार्यक्रमात त्यांनी सादरीकरण केलं. कार्यक्रमादरम्यान त्यांना त्रास होऊ लागल्यानं ते हॉटेलवर परतले. तिथं अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास नेण्यात आलं. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं.

हिंदीव्यतिरिक्त तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी, गुजराथी आदी भाषांत त्यांनी पार्श्वगायन केले होते. १९९९ मध्ये आलेल्या ‘पल’ अल्बममुळे केके लोकप्रिय झाले. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल से’ या गाण्यामुळे त्यांना प्रसिद्धी लाभली. रहना है तेरे दिल में चित्रपटातील ‘सच कह रहा है दिवाना’ हे गाणेही प्रचंड लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी ‘दस बहाने करके ले गयी दिल’, ‘आँखों में तेरी अजबसी अदा है,’ ‘तू ही मेरा शब है’ आदी लोकप्रिय गाणी गायली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here