विजांच्या कडकडाटासह तुफान असा पाऊस सांगली-मिरज शहरासह परिसरामध्ये बरसला आहे. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झालं होतं. मात्र, आनंदाची बाब म्हणजे मान्सूनच्या पावसाचं आगमन वेळेत झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.
राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस येईल असे संकेत हवामान खात्याने वर्तवले होते. ते आता खरे ठरताना दिसत आहेत. याचदरम्यान, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पुढील ३ ते ४ तासात अहमदनगर, पुणे आणि सांगली जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी ४० किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
तसेच विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पुढील काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील निर्जन ठिकाणी येण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ कोणीच बाहेर पडण्याची सूचना देण्यात आली आहे.