gharkul yojana: घरकुलच्या तिसऱ्या हप्त्यासाठी घेतली लाच, २ कंत्राटी अभियंत्यांवर कारवाई – hingoli crime news action against two contract engineers for took bribe
हिंगोली : वसमत तालुक्यातील अकोली येथे घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तसेच लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांनी बुधवारी काढले आहेत.
वसमत तालुक्यातील अकोली येथील एका लाभार्थ्याच्या बँक खात्यात घरकुलाचा तिसरा हप्ता जमा करण्यासाठी वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता शेख समीर शेख खैसर याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच अन्य कंत्राटी अभियंता करीम कुरेशी शादुल्ला याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. दरम्यान, बुधवारी (११) अभियंता शेख समीर याने लाभार्थ्यांकडून १० हजार रुपयाची लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. याप्रकरणी शेख समीर व लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणारा अभियंता करीम कुरेशी यांच्याविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. लाईट बिल भरलं नाहीए? बिल अपडेटसाठी २० रुपये भरले अन् बँक खात्यातून ४६ हजार गेले या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिंगोली जिल्हा परिषदेला घटनेची सविस्तर माहिती कळवली होती. त्यानंतर आज मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी दोन्ही कंत्राटी अभियंत्यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे.